asymptomatic transmission

तुम्ही पाहिले असेल, की काही रहस्यमय चित्रपटांमध्ये किंवा कथांमध्ये ज्या पात्रावर सर्वांत कमी संशय असतो तेच पात्र गुन्ह्यांची सूत्रधार असते. कोविड-19 महामारीदेखील अशी सारखीच परिस्थिती दाखवित आहे; काही बाधित व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणे दिसून येत नाहीत, परंतु त्यांच्याकडून नकळतपणे इतरांना विषाणूचा संसर्ग होत आहे. वैज्ञानिकांना तसे साथरोगतज्ज्ञांना असा संशय आहे की, या बाधित परंतु लक्षणरहित व्यक्ती महामारीच्या भडक्यात तेल टाकू शकतात. अशा लक्षणरहित व्यक्तींना ओळखले आणि त्यांचा मागोवा घेतला, तर पुढच्या काळासाठी रोगाच्या चाचण्यांसंबंधी आणि प्रतिबंधित क्षेत्रांसंबंधी धोरणे ठरवता येतील.
 
Have you noticed that in some thriller movies or novels the least suspected protagonist ends up being the criminal mastermind? Well, the COVID-19 pandemic is beginning to present a similar situation wherein some infected individuals show no symptoms of disease, but are unwittingly transmitting the virus to others. Scientists and epidemiologists suspect that this infected but symptom-free population (asymptomatic) may be fuelling the pandemic. A deeper understanding and tracking of these asymptomatic individuals could shape future testing strategies and containment plans.